Thu, Jan 24, 2019 07:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे प्रशासन अलर्ट; आणखीन एक ब्रिज वाहतुकीस बंद

रेल्वे प्रशासन अलर्ट; आणखीन एक ब्रिज वाहतुकीस बंद

Published On: Jul 08 2018 10:38AM | Last Updated: Jul 08 2018 10:38AMठाणे : रुतिका वेंगुर्लेकर

वसई  माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वसई पूर्व-पश्चिम मार्ग जोडणारा अंबाडी ओव्हर ब्रिज आज मध्यरात्री पासून  सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. पुढील आदेश होईपर्यंत ब्रिज बंद राहणार असल्याचे वरीष्ठ अनुभाग अभियंता (पूल) पश्चिम रेल्वे परेल मुंबई यांनी पालिकेला कळविले आहे 

अंबाडी ओव्हर ब्रिजबाबत वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात रेल्वे विभाग, रेल्वे पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अधिकारी यांची बैठक झाली. त्यामध्ये पश्चिम रेल्वेचे सेक्शन इंजिनिअर यांनी मध्यरात्री 12 वाजल्यापासून वाहतुकीस बंद करण्यात आल्याचे सांगितले. पर्यायी मार्गबाबत पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वसई यांना कळवण्यात आले आहे. त्यांनी योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे.तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतूक कोंडी होणार असल्याने नागरिकांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.