Sat, Nov 17, 2018 13:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिक्षावर फांदी कोसळून तरुणाचा मृत्यू

रिक्षावर फांदी कोसळून तरुणाचा मृत्यू

Published On: Jul 25 2018 1:57AM | Last Updated: Jul 25 2018 1:38AMमुलुंड : प्रतिनिधी

मुलुंड येथील मुलुंड कॉलनी विभागात गुरु गोविंदसिंग मार्ग हिंदुस्थान चौकाजवळ पिंपळाच्या झाडाची फांदी रिक्षावर पडून डोंबिवलीकर रवी शहा (32) या प्रवाशाचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी उर्वी शहा (27), रिक्षाचालक चंद्रभान रमाशंकर गुप्‍ता (40) गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली.

शहा दाम्पत्य रवी यांच्या बहिणीला भेटण्यासाठी मुलुंड कॉलनी येथे आले होते. मुलुंड रेल्वे स्थानकाकडे रिक्षाने जातानाच हिंदुस्थान चौकाजवळ पिंपळाची फांदी कोसळून रिक्षाचा चक्‍काचूर झाला. अग्रवाल रुग्णालयात दाखल केले असता रवी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यापूर्वीही मुलुंडमध्ये फांदी कोसळून 3 विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. तरीही मुंबई पालिकेने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. अग्रवाल रुग्णालयात जखमींचेही हाल झाले आणि पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना अन्यत्र हलवावे लागल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत पालिकेचा निषेध केला.