Fri, Mar 22, 2019 23:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : नाल्यात पडून लहान मुलाचा मृत्यू 

ठाणे : नाल्यात पडून लहान मुलाचा मृत्यू 

Published On: Jun 25 2018 4:58PM | Last Updated: Jun 25 2018 4:58PMठाणे : अमोल कदम

कळवा रेल्वे स्थानक येथे रेल्वे रुळाच्या बाजूच्या नाल्यात सोमवारी दुपारी एक लहान मुलगा पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.  

कळवा पूर्व न्यू शिवाजी नगर येथील सम्राट नगर येथे राहणारा विजय किसन पवार हा दहा वर्षाचा लहान मुलगा आपल्या परिवारासह रेल्वे रुळाच्या बाजूला नाल्याच्या जवळील घरात राहत होता. पावसामुळे नाल्याचे पाणी भरले.  त्यावेळी लघुशंका करण्याकरिता विजय नाल्याच्या इथे गेला होता. नाल्यावर सिमेंटचे स्लॅब नसल्याने विजय नाल्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली असल्याचे कळवा पोलीसानी सांगितले. ह्या परिसराला लागूनच मध्य रेल्वे मार्ग आहे. नागरिकांनी रूळ ओलांडू नये याकरिता संरक्षित भिंत या रुळाच्या बाजूने रेल्वेच्या वतीने बांधण्यात आली. परंतु संरक्षित भिंत बांधण्यात आली पण नाल्यावर सिमेंट क्रिन्क्रीटीकरणाचा स्लॅब टाकण्यात आला नसल्याने विजयचा या नाल्यात पडून मृत्यू झाला असल्याचे या परिसरातील नागरिक सांगत आहेत.  त्यामुळे या नाल्याच्या वर रेल्वेने तात्काळ सिमेंट काँक्रीटीकरण करावे आणि संरक्षित भिंत उभारावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.