Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'श्री' माझ्यासाठी माझं प्रेम : बोनी कपूर

'श्री' माझ्यासाठी माझं प्रेम : बोनी कपूर

Published On: Feb 28 2018 11:46PM | Last Updated: Mar 01 2018 2:26AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

दुबईमध्ये निधन झालेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्‍कारानंतर त्यांचे पती दिग्दर्शक बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या वाईट प्रसंगात दिलेल्या धीराबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

या पोस्‍टव्‍दारे बोनी कपूर यांनी श्रीदेवी ही जगासाठी जरी चांदणी असली तरी ती माझ्यासाठी माझं प्रेम होती. माझ्या मुलांची आई, मित्रांची काळजीवाहू मैत्रीण आणि माझ्यासोबत राहणारी माझी साथीदार होती अशी भावना व्‍यक्‍त केली आहे. 

श्रीदेवी यांच्या निधनानंतर मला आणि माझ्या मुलांना धीर दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे, हितचिंतकांचे, नातेवाईक, मित्र परिवार त्‍यांनी आभार मानले आहे. यांच्या बरोबरच मुलगा अर्जुन कपूर आणि अंशुला यांचे विशेष आभार मानले  ते म्हणाले ‘माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी खंबीरपणे उभे होते.’  

बाकीच्यांच्या दृष्टीने श्रीदेवी ही चांदणी, एक अनन्यसाधारण कलाकार असेल पण, माझ्या दृष्टीने ती माझे प्रम होती, मैत्रिण होती, माझ्या मुलींची आई होती.. श्रीदेवी ही श्री या शब्दामुळे कायम आमच्या स्‍मरणार राहिल अशी भावना व्‍यक्‍त केली आहे. 

या काळानंतर माझ्या मुलींना साथ देणे आणि त्यांच्यासोबत राहणे हे आमचे कर्तव्‍य आहे. श्री आमचे सर्वस्‍व होती. ती आमची ताकद होती तशीच ती आमच्या सार्‍यांचं हसू होती, याही पलिकडे जाऊन आमच्या नात्यातील प्रेम अबाधित होते असे भावूक उद्‌गार त्यांनी श्रीदेवीच्या अकाऊंटवरून काढले आहेत.  तुझ्या जाण्याने आता आपले आयुष्य आता कधीच समांतर राहणार नसल्याचं सांगून त्‍यांनी तिला आंदराजली वाहली आहे. 

pic.twitter.com/VNgw7FY9rF

— SRIDEVI BONEY KAPOOR (@SrideviBKapoor) February 28, 2018