Mon, Aug 19, 2019 15:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तेलतुंबडेंच्या याचिकेवर २२ फेब्रुवारीला सुनावणी

तेलतुंबडेंच्या याचिकेवर २२ फेब्रुवारीला सुनावणी

Published On: Feb 11 2019 8:10PM | Last Updated: Feb 11 2019 8:09PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव- भीमा हिंसाचार प्रकरणी माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे. 

जर तेलतुंबडे यांना अटक केली तर त्यांची १ लाखांच्या जामिनावर सुटका केली जाऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच त्यांना १४ आणि १८ फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

एल्गार परिषदेशी व सीपीआय माओवादी या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणावरून डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली होती. डॉ. तेलतुंबडे यांची त्यांच्यावरील आरोप रद्द करण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळात त्यांना चार आठवड्यांची मुदत देत, अटकपूर्व जामीन किंवा जामिनासाठी योग्य न्यायालयात अर्ज करण्याचे नमूद केले होते. त्यानुसार त्यांनी अर्ज केला आहे.