Thu, Nov 22, 2018 16:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवी यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा

श्रीदेवी यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा

Published On: Feb 25 2018 7:51AM | Last Updated: Feb 25 2018 7:51AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातूनही श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

‘‘माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस. अशा शब्‍दात प्रियांका चोप्राने ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.