Thu, May 23, 2019 20:31
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोगस डॉक्टरांचा शोध सुरू

बोगस डॉक्टरांचा शोध सुरू

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी

वैद्यकीय उपचारासाठी परवानगी मिळावी म्हणून खोटी कागदपत्रे सादर करून रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यास महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सुरुवात केली आहे. राज्यातील जवळपास 100  डॉक्टरांच्या संशयित कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली. 

वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अर्थात मेडिकल कौन्सिलकडे विद्यार्थी नोंदणी करतात. एमसीएकडून नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचार करण्यास कायदेशीररित्या मान्यता असते. एखाद्या विशिष्ट विषयात उपचार करण्यास परवानगी मिळविणार्‍या काही डॉक्टरांनी सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचे मेडिकल कौन्सिलच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही प्रकरणात डॉक्रांच्या पदव्युत्तर पदविकेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आल्याचे डॉ. उत्तुरे यांनी सांगितले. 

अस्थिरोगतज्ञ, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचार आदी विविध क्षेत्रात उपचार करण्यास मान्यता मिळावी म्हणून पदव्युत्तर पदवी किंवा पदविका पूर्ण केल्याबाबतची खोटी प्रमाणपत्रे डॉक्टरांनी सादर केली आहेत. एखाद्या विशिष्ट विषयात उपचार करण्यासाठी परवानगी हवी असेल तर त्यासंदर्भात शिक्षण घेतल्याची कागदपत्रे मेकिडल कौन्सिलकडे सादर करून पुर्ननोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र बर्‍याचदा डॉक्टर कोणत्याही प्रकारची नोंदणी न करताच विशेष उपचार सुरू करतात. डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील कागदपत्रांच्या पडताळणीमुळे या क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने काम करणार्‍यांना आळा बसेल, असे त्यांनी सांगितले.

Tags : mumbai, mumbai news, bogus doctor, Searching, Maharashtra Medical Council, started,