Mon, Nov 19, 2018 19:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई मनपाचा शत्रुघ्न सिन्हांच्या बंगल्यावर हातोडा

मुंबई मनपाचा शत्रुघ्न सिन्हांच्या बंगल्यावर हातोडा

Published On: Jan 09 2018 5:30PM | Last Updated: Jan 09 2018 5:30PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑलाईन

अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्‍न सिन्हा यांचे अनधिकृत बांधकाम मुंबई मनपाने पाडले आहे. सिन्हा जुहू येथील 'रामायण' बंगल्यात कुटुंबासोबत राहतात. बंगल्यात काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे पालिकेने ही कारवाई  केली. 

सिन्हा यांच्या अनधिकृत बंगल्याच्या छतावर स्वच्छतागृह, कार्यालय आणि देवघराचेही बांधकाम केले होते. याबाबत पालिकेने ५ डिसेंबर २०१७ रोजी सिन्हा यांना एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ (१) अंतर्गत नोटीस पाठविली होते. नोटीस मिळाल्‍यापासून एका महिन्याच्या आत हे बांधकाम हटविण्याच्या पालिकेने सिन्हा यांना सुचना दिल्‍या होत्‍या. ६ जानेवारी रोजी सिन्हा यांना नोटीस पाठवून एक महिना झाल्‍याची पालिकेकडून आठवणही करून देण्यात आली होती. नोटीस दिल्‍यापासून एक महिना पूर्ण झाल्‍यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज ही कारवाई केली.  

यावेळी सिंन्हा यांच्या बंगल्‍यातील देवघर वगळता इतर बांधकाम तोडण्यात आले. देवघरातील मंदिर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास सांगितले आहे. त्यानंतर ते बांधकाम हटवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत', असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.