Tue, Apr 23, 2019 21:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

Published On: May 31 2018 8:08AM | Last Updated: May 31 2018 8:12AMमुंबईः पुढारी ऑनलाईन

जेष्ठ भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांचे आज मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. पहाटे ४.३५ मिनिटांनी त्यांनी मुंबईतील सोमय्या दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला.  

पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनाने भाजपसह सर्वांनाच धक्का बसला. फुंडकर हे आजारी नव्हते. मात्र हृदयविकाराने त्यांना अवचित गाठल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणातील बडा चेहरा हरपला आहे. महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी पांडुरंग फुंडकर यांचं मोठं योगदान आहे. गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनी महाराष्ट्रात भाजपचा प्रचार आणि प्रसार केला. ग्रामीण आणि शेती प्रश्नाची जाण असल्याचा नेता म्हणून फुंडकर परिचित होते.

फुंडकर यांनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपदही भूषवलं होतं.  महाराष्ट्रात भाजपचं अस्तित्व नव्हतं, तेव्हापासून भाजप वाढवण्यासाठी ज्या काही नेत्यांनी काम केलं, त्यापैकी एक म्हणजे पांडुरंग फुंडकर होय.

अतिशय वाईट आणि धक्कादायक बातमी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‪आमचे ज्येष्ठ नेते, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, राज्याचे कृषीमंत्री श्री भाऊसाहेब फुंडकर यांचे आज निधन झाले. ‬ ‪त्यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे.‬ ‪विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

फुंडकर काकांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

हृदयात रिकामं रिकामं वाटणारी भावना होते जेव्हा आपला कोणी माणूस जातो! फुंडकर काका गेल्याने असंच वाटत आहे ..मुंडे साहेबांचे जीवलग मित्र आमचे कुटुंबातील सदस्य भाजपाचे जेष्ठ नेते कृषी मंत्री हयात नाही..न भरून येणारी पोकळी .तीव्र दुःख होत असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर व्यक्त केली.