ठाण्यात भाजपच्या नगरसेवकाचा मृत्यू

Last Updated: May 29 2020 3:48PM
Responsive image


ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा काल रात्री आकस्मित मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून त्यांचे शव विच्छेदानासाठी सिव्हिल रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

वाचा :मुंबईतील ११ हॉटस्पॉटमध्ये १५०० पेक्षा जास्त रुग्ण

विलास कांबळे हे भाजपचे वादग्रस्त नगरसेवक होते, यापूर्वी त्यांनी स्थायी समितीचे सभापती पद देखील भूषविले होते. त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला आहे. हे आता शवविच्छेदानंतरच स्पष्ट होणार आहे.

वाचा :'मुंबईतील जवळपास ९९ टक्के आयसीयू बेड फुल्ल'