Sat, Mar 23, 2019 18:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जन्म-मृत्यू दाखल्यामध्ये फेरफाराचा अधिकार नाही

जन्म-मृत्यू दाखल्यामध्ये फेरफाराचा अधिकार नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

आपल्या रेकॉर्डला असलेल्या जन्म किंवा मृत्यू दाखल्यामधील जन्म किंवा मृत्यूच्या नोंदीमध्ये फेरफार करण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला कळवले आहे. एका अविवाहित महिलेने याबाबत न्यायालयात धाव घेतली असून हा खटला न्यायमूर्ती ए. एस. ओखा व आर. आय. छगला यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे.

सदर महिला नालासोपाराची असून तिला जन्म दाखल्यावरच्या तिच्या मुलीच्या(अपत्य) वडिलांचे नाव वगळायचे आहे. मात्र, तिला मूल झाल्यानंतर तिने आपण विवाहित असल्याचे सांगून जन्म दाखल्यावर मुलीच्या वडिलांचे नावही नमूद केले आहे. तसेच, आपला पती बिझनेसमन असल्याचेही नमूद करून तसा फॉर्मही भरल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळेच संबंधित प्रकरणात वडिलांच्या नावाशिवाय जन्मदाखला देणे महापालिकेच्या जन्मनोंद विभागाला शक्य नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. संबंधित महिला 31 वर्षांची असून तिने न्यायालयासमोर आपण अविवाहित असल्याचे सांगितले आहे. तसेच तिला झालेले कन्यारत्न हे  टेस्ट ट्यूब मेथडचा वापर करून ऑगस्ट, 2016 मध्ये जन्मले असल्याचे तिचे म्हणणे आहे. वैद्यकीय नियमावलीनुसार वीर्य डोनरचे नाव गुप्त ठेवले जाते. त्यामुळे ते आपल्याला समजण्याचा वा महापालिकेला देण्याचा प्रश्‍नच येत नाही, अशी भूमिका तिने घेतली आहे. सबब, सदर नाव जन्म दाखल्यावरून वगळावे अशी तिची मागणी आहे. 

महापालिकेचे वकील सुरेश पाकळे हे असून त्यांनी न्यायालयासमोर मुलीच्या जन्मदाखल्याबरोबरच त्यावेळची मूळ कागदपत्रेही न्यायालयात सादर केली असून न्यायालय कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Tags : birth and death certificate does not have the right to refrain, mumbai news,


  •