Tue, May 21, 2019 22:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भिवंडी : पुढारी ऑनलाईन

भिवंडी शहरातील नविबस्ती केजीएन चौक भाजी मार्केट येथे काल, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आडचा चार वर गेला आहे. या ठिकाणी सुरू असणारे बचाव व मदतकार्य थांबवण्यात आले आहे. 

शुक्रवारी भिवंडी येथील इमारतीच्या ढिगार्‍यातून तीन मृतदेह बाहेर काढले होते. त्यानंतर परवीन खान या महिलेचा शोध रात्रभर सुरू होता. एनडीआरएफच्या जवानांनी तब्बल २२ तास शोध मोहीम केल्यानंतर पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास परवीन यांच्या मृतदेह सापडला. मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आल्यानंतर येथील बचाव व मदत कार्य थांबविण्यात आले आहे .

या दुर्घटनेस जबाबदार बिल्डर ताहिर अन्सारी यावर महानगरपालिकेच्या वतीने शहर पोलिस स्टेशन येथे रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अन्‍सारी याला अटक करण्यात आले आहे. तर या दुर्घटनेत जखमी ९ जणांवर भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालय व ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.