होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयासमोर कंबरेला खराटा बांधून आंदोलन

मंत्रालयासमोर कंबरेला खराटा बांधून आंदोलन

Published On: Jan 09 2018 6:06PM | Last Updated: Jan 09 2018 6:35PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करत या घटनेतील दोषींना अटक करावी, तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी आरपीआयच्या खरात गटाकडून मंत्रालयाबाहेर अनोखे आंदोलन करण्यात आले. खरात गटाच्या सचिन खरात यांनी मंगळवारी गळ्यात गाडगे आणि कंबरेला खराटा बांधून मंत्रालयासमोर आंदोलन केले. त्यांच्या या अनोख्या आंदोलानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंत्रालय परिसरात खरात यांच्या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती.