Tue, Jul 23, 2019 00:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईत हिंसक पडसाद(व्‍हिडिओ)

भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईत हिंसक पडसाद(व्‍हिडिओ)

Published On: Jan 02 2018 2:05PM | Last Updated: Jan 02 2018 2:06PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथे दोन गटात झालेल्‍या संघर्षाचे पडडसाद मंगळवारी राज्‍यभर उमटले. सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, सांगलीसह मंबईमध्येही बसची तोडफोड करण्यात आली. मुंबईतील चेंबूर कॅम्‍प परिसरात ८ बेस्‍ट बससेसची तोडफोड करण्यात आली. चेंबूर नाका परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्‍यामुळे येथील दुकाने बंद ठेवण्‍यात आली आहेत. तर चेंबूर रेल्‍वे स्‍टेशनवर रेल रोको करण्‍यात आले.

सायन-पनवेल मार्गावरील चेंबूर नाका येथे आज सकाळी साडे दहा वाजता रास्ता रोको करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिक सहभागी झाले होते. यावेळी परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. तसेच निषेध करत जोरदार घोषणा देण्यात आल्या. रास्तारोको केल्यामुळे पनवेल व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला. 

मुलुंडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टेशन रोड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी मोर्चा काढत मुलुंड पोलिस उपायुक्तांना निवेदन दिले.