Sun, May 26, 2019 10:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'बीडीडी चाळीत तीस वर्षांपासून राहणाऱ्या पोलिसांना म्हाडाची घरे द्या' 

'बीडीडी चाळीत तीस वर्षांपासून राहणाऱ्या पोलिसांना म्हाडाची घरे द्या' 

Published On: Jan 29 2018 4:26PM | Last Updated: Jan 29 2018 4:26PMमुंबई : प्रतिनिधी

बीडीडी चाळीत तीस वर्षापासून राहणाऱ्या पोलिसांना घरे तयार झाल्यावर हस्तांतरित करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत म्हाडाला दिले.

बीडीडी चाळीत गेल्या तीस वर्षांपासून जवळपास २९५० पोलिस कुटुंबीय राहतात. म्हाडाची घरे तयार झाल्यावर त्यापैकी २९५० घरे गृह विभागाला हस्तांतरित करावीत. घरे देताना त्याचे निकष काय असावेत, याचा निर्णय गृह विभागाने घ्यावा. १९९६ नंतर नंतर बीडीडी चाळीत अनधिकृत राहणाऱ्या कुटूंबियांना काही दंड आकारुन त्यांनाही नियमित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली तसेच म्हाडाची घरांची कामे तातडीने सुरु करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत बैठकीला गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.