Sat, Mar 23, 2019 12:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुर्बानीच्या ऑनलाईन परवान्याबाबत आज फैसला

कुर्बानीच्या ऑनलाईन परवान्याबाबत आज फैसला

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:51AMमुंबई : प्रतिनिधी 

बकरी ईदनिमित्ताने महापालिकेच्या ऑनलाईन परवन्याचा फैसला मंगळवारी होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी याच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी मंगळवारी 21 ऑगस्टला निश्‍चित केली आहे. 

मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पालिकेला यापुढे ऑनलाईन परवानगी देऊ नका, असा आदेश दिला आहे. परंतु त्यापूर्वी दिलेल्या परवान्यांचे काय असा प्रश्‍न उपस्थित झाला असून त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

22 ऑगस्टच्या रोजी बकरी ईदच्या पार्श्‍वभमीवर मुस्लिम बांधव मोठ्याप्रमाणात बकर्‍यांची आणि मेंढ्यांची कत्तल करतात. देवनार पशुवध केंद्रावर या दिवशी मोठा ताण पडतो. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने 22 ते 24 ऑगस्टदरम्यान तात्पुरती परवानगी दिली. 

पालिकेन दिलेली परवानगी ही बेकायदा आहे, असा दावा करून या परवानगीला अनुसरून काढण्यात आलेल्या दोन नोटिसांना आव्हान देणारी जनहित याचिका जीव मैत्री ट्रस्टने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

पालिकेने अंतराळवीर नील आर्म स्ट्राँगच्या नावे बकर्‍याच्या कुर्बानीसाठी ऑनलाईन परवानगी दिल्याचे उघड झाल्यानंतर न्यायालयाने ऑनलाईन परवाना थांबविण्याचे आदेश पालिकेला दिले आहे.