Sat, Mar 23, 2019 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे पादचारी पुलावर गोंडस बाळाचा जन्म

रेल्वे पादचारी पुलावर गोंडस बाळाचा जन्म

Published On: Sep 03 2018 11:04AM | Last Updated: Sep 03 2018 11:04AMनालासोपारा : 

नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर रविवारी सकाळी एका महिलेने बाळाला जन्म दिला. त्यांना पुढील उपचारासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या माता बालसंगोपन केंद्रात दाखल करण्यात आले. नालासोपारा पश्‍चिमेत हनुमान नगर येथे राहणार्‍या रेश्मा बेगम (26) या कांदिवली येथे जात होत्या. त्या रेल्वे स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलावरून जात असताना त्यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. प्रवाशांनी ही माहिती स्थानक अधीक्षक रामकेश मीना यांना दिली.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पवन कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक धर्मपाल मीना, सिटी राजेंद्र प्रसाद, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे भालेराव, पोर्टर आणि दोन महिला सफाई कर्मचार्‍यांच्या मदतीने 108 च्या डॉक्टरांना बोलावून तिची सुखरूप सुटका केली. रेश्मा यांनी तेथेच गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर मायलेकांना पुढील उपचारासाठी रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी पालिकेच्या माता बालसंगोपन केंद्रात दाखल केले. रेश्मा व बाळाची प्रकृती ठिक असल्याचे माता बालसंगोपन केंद्राच्या अधीक्षक गायत्री गोरख यांनी सांगितले.