Thu, Sep 20, 2018 21:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के गोयल यांचं निधन

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के गोयल यांचं निधन

Published On: Feb 20 2018 2:28PM | Last Updated: Feb 20 2018 2:27PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी.के गोयल(वय ८२) यांचं मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

डॉ. गोयल हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते. डॉ. गोयल यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यानंतर डॉ. गोयल यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रूग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉ. गोयल यांच्या कारकिर्दीत त्यांना २००५ साली पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले होते. डॉ. गोयल हे बॉम्बे हॉस्पिटल इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यासोबतचं जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डियोलॉडीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणून कार्यरत होते.

डॉ. गोयल यांच्या निधनाच्या वृत्तावर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी शोक व्यक्त केला आहे.  गिरीष महाजन म्हणाले, “मी गेल्या १० वर्षांपासून डॉ. गोयल यांना ओळखत होतो. गरीब रूग्णांसाठी त्यांचं फार मोठं कार्य होतं. गरीब रूग्णांवर त्यांनी मोफत उपचार केले होते. डॉ. गोयल यांचं निधन हे राज्यासाठी मोठं नुकसान आहे.”