Fri, May 24, 2019 21:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेने दिंडोशीत भाजप नगरसेवकाचे कार्यालय फोडले 

मनसेने दिंडोशीत भाजप नगरसेवकाचे कार्यालय फोडले 

Published On: Sep 10 2018 2:44PM | Last Updated: Sep 10 2018 2:44PMमुंबई : प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येवून भारत बंदच्या आंदोलनावेळी दिंडोशी मतदार संघात मनसे कार्यकर्त्यांनी भाजप नगरसेवक तथा मालाड जिल्हा सहकारी बॅकेचे अध्यक्ष विनोद मिश्रा यांचे कार्यालय फोडले.

यामुळे दिंडोशी परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण पसरले आहे. हिंसक घटना घडू नये, म्हणून या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाची आणि कुरार पोलिस ठाण्यातील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पश्चिम उपनगरांत काही ठिकाणी बेस्ट बस आणि अॅटो रिक्षा सुरळितपणे सुरू असल्याच्या दिसून आल्या. तर हॉटेल, किराणा दुकाने आणि स्कूल बस बंद होत्या.

 अंधेरी वर्सेवा मेट्रो रेल्वेही मनसे कार्यकर्त्यांनी रोखली आहे तर, कांदिवली एक बेस्टची तोडफोड केली. काँग्रेस, राष्टवादीपेक्षा मनसे कार्यकर्ते मुंबईसह पश्चिम उपनगरांत आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक मनसैनिकांना स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये स्थानबंध करण्यात आले आहे. दिंडोशी मतदार संघात मनसे कार्यकर्ते नेहमी आक्रमक असतात. याआधीही पालिका निवडणुकीदरम्यान भाजप मुंबई युवा अध्यक्ष मोहित कंबोज यांच्याशीही झटापटी झाली होती.