Fri, Nov 16, 2018 13:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विमानतळावर हल्ल्याची धमकी

मुंबई विमानतळावर हल्ल्याची धमकी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विमानतळावर 26 जानेवारी 2018 किंवा त्याआधी दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे एक पत्र येथील कार्गो टर्मिनल इमारतीच्या शौचालयामध्ये बुधवारी सायंकाळी सापडल्याने तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास सापडलेल्या या पत्रानंतर सीआयएसएफने संपूर्ण विमानतळ रिकामे करत रात्री आठपर्यंत संशयास्पद व्यक्ती, सामान, वस्तूंचा शोध घेतला. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

कार्गो टर्मिनलमध्ये साफसफाई सुरू असताना एका कर्मचार्‍याला शौचालयामध्ये हे धमकीचे पत्र सापडले. 26 जानेवारी 2018 रोजी किंवा त्याआधी कार्गो टर्मिनलवर दहशतवादी हल्ला होणार असे लिहिण्यात आले आहे. हा हल्ला इसिस किंवा अन्य दहशतवादी करू शकतात, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्राची गांर्भियाने दखल घेत, विमानतळ प्रशासानाने याची माहिती सर्व तपास यंत्रणांना दिली. सीआयएसएफने संपूर्ण विमानतळ रिकामे करत शोधमोहीम सुरू केली. घटनेची वर्दी मिळताच मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथक, राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि अन्य तपास यंत्रणांच्या पथकांनी विमानतळावर धाव घेतली. तब्बल तीन तास शोधकार्य केल्यानंतर प्रवाशांची पूर्ण तपासणी करुनच त्यांना विमानतळावर सोडण्यात येत आहे. हे सर्च ऑपरेशन रात्रभर सुरूच राहणार असून संपुर्ण शहरात हायअर्लट जारी करण्यात आला आहे. शहराच्या प्रवेशद्वारासह महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करत, नाकाबंदी करून संशयित वाहने, वस्तू आणि सामानांची तपासणी करण्यात येत आहे.