Sun, Jul 05, 2020 22:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश

अ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश

Published On: May 06 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 1:51AMमुंबई :

अनुसूचित जाती, जमाती कायदा शिथिल करणार नसल्याचे सांगून, केंद्रीय अन्‍न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार त्याबाबतचा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासंदर्भातील उच्चस्तरीय समितीने हा कायदा ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका सादर केल्याचेही ते म्हणाले. गरज पडली तर यासंदर्भात अध्यादेश काढण्याचीही सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहात प्रत्येक विद्यार्थ्यामागे 15 किलो धान्य देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. खुल्या प्रवर्गातील वसतिगृहात जर दोन तृतीयांश विद्यार्थी हे अनुसूचित जाती, जमाती तसेच वरील अन्य प्रवर्गातील असतील, तर त्यांनाही ही सुविधा मिळणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले.