Sun, Nov 18, 2018 03:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा प्रत्येकवेळी गैरवापर होतो असे नाही'

‘अ‍ॅट्रॉसिटी’चा प्रत्येकवेळी गैरवापर होतो असे नाही'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

अनुसूचित जाती-जमातीतील लोकांच्या रक्षणार्थ असलेल्या अ‍ॅट्रॉसिटीविरोधी कायद्याचा प्रत्येक प्रकरणात गैरवापर केला जातो, असे गृहीत धरले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याचा निष्पाप नागरिकांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जात असल्याची टिपणी केली होती.

सोलापूर येथील रहिवाशी आकाश कडावे याच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात सोलापूर सत्र न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 18 चा संदर्भ देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याविरोधात कडावे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्या अपिलावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमारे सुनावणी झाली.

उभय पक्षांच्या युक्‍तिवादानंतर न्यायालयाने, प्रत्येक प्रकरणात अ‍ॅट्रॉॅसिटीविरोधी कायद्याचा प्रत्येकवेळी गैरवापर होतो असे नाही. निरीक्षण नोंदविताना अ‍ॅट्रॉसिटीविरोधी कायदा हा घटनात्मक आणि वैध असल्याचे आढळून येते़ अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास मनाईसुद्धा तेवढीच कायदेशीर आणि वैध आहे़ त्यामुळे सत्र न्यायालयाचा  कडावेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्यच आहे, असे मत व्यक्‍त करून अपील फेटाळून लावले.

तक्रारदाराच्या दुचाकीची आकाश कडावेला धडक बसली होती़  याच मुद्द्यावरून कडावे आणि तक्रारदारामध्ये वाद झाला होता़  त्यानंतर दोघांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली होती.

 

Tags : mumbai, mumbai news, atrocity, misused, Bombay High Court,


  •