होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आश्विनी बिंद्रेंचे वूड कटरने तुकडे केले

आश्विनी बिंद्रेंचे वूड कटरने तुकडे केले

Published On: Mar 02 2018 8:54PM | Last Updated: Mar 02 2018 8:58PMपनवेल: विक्रम बाबर

सहाय्यक पोलिस निरीक्षक आश्विनी बिंद्रे प्रकरणाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे. आश्विनी बिंद्रेंचा प्रियकर पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांनी मित्रांच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले आहे. मात्र पोलिसांना अद्यापही ठोस पुरावा हातात लागला नसल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात येत आहे. आश्विनी बिंद्रे यांच्या शरीराचे कटरच्या मदतीने बारीक  बारीक तुकडे करून काही दिवस घरातील फ्रीज मध्ये ठेवल्याचा खुलासा पोलिसांना मिळाला आहे.  अभय कुरुंदकर यांच्या मित्राला पोलिसांनी अटक केल्या नंतर हत्येचा खुलासा झाल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

आश्विनी बिंद्रे यांच्या हत्येच्या घटनेनंतर नवी मुबई पोलिसांनी या हत्येप्रकरणी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा सचिन पाटील, अभय कुरुंदकर यांचा चालक भंडारी आणि अभय कुरुंदकर यांचा जवळचा मित्र महेश फळणीकर याना अटक करण्यात आली आहे. अभय कुरुंदकर आणि सचिन पाटील यांना अटक झाल्यानंतर हे दोन्ही आरोपी पोलिसांना तपासात मदत करत नसल्याचे पोलिस सांगत होते. मोबाईल लोकेशन च्या मदतीने माहिती घेतल्या नंतर अभय कुरुंदकर यांचा मित्र आणि चालक यांचं मोबाईल लोकेशन हे वसई खाडी परिसरातील असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानुसार नवी मुबई पोलिसांनी अभय कुरुंदकर यांचा चालक भंडारी, आणि जवळचा मित्र महेश फळणीकर याना अटक केल्यानंतर हत्येचा खुलासा त्यांनी केला आणि हत्या करून मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकल्याची कबुली महेश फळणीकर यांनी कोर्टात दिली. त्यानंतर हत्याचे भयंकर सत्य चित्र पोलिसांना समोर आले आहे.

हत्येचा नाट्यक्रम

अभय कुरुंदकर यांच्या भांडण होऊन ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. ही हत्या लग्न करण्यावरून झालेल्या वादावादीत झल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगितले जात आहे. भाईंदर येथील अभय कुरुंदकर यांच्या घरी भेटायला गेलेल्या आश्विनी बिंद्रे यांची अभय यांच्या बरोबर वादावादी झाली या वादावादी दरम्यान अभयने क्रिकेट बॅटच्या ( वजनदार लाकडांनी ) अश्विनी यांच्या डोक्यात मारहान करून बिंद्रेंची हत्या केली आणि नंतर कटरच्या मदतीने आश्विनी बिंद्रे यांच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर या तुकड्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी अन्य आरोपीच्या मदतीने शरीराचे तुकडे एका लोखंडी पेटीत भरून मित्राच्या मदतीने वसई खाडीत फेकल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगितले. या मिळालेल्या माहितीनंतर पोलिस पथकांनी अभय कुरुंदकर यांच्या घरातील फ्रीज ताब्यात घेतला असून खाडीतील लोखंडी पेटी आणि शरीराचे तुकडे शोधण्यासाठी अग्निशमनदल, तसेच नौदलची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.