Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रेची हत्याच, पोलिस तपासात स्‍पष्ट

अश्विनी बिद्रेची हत्याच, पोलिस तपासात स्‍पष्ट

Published On: Mar 01 2018 7:48PM | Last Updated: Mar 01 2018 8:19PMनवी मुंबई : राजेंद्र पाटील

नागरी हक्क संरक्षण विभागाच्या ठाणे ग्रामीण विभागाचा कारभार हाताळणार्‍या सहायक पोलिस  निरीक्षक अश्‍विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणा आज अखेर उलगडा झाला. पुणे कात्रज येथून अटक केलेल्या कुरूंदकरचा मित्र महेश फळणीकरने गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत कटरने अश्विनीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकल्याचे सांगितले. याबाबत पनवेल न्यायालयात आज या चारही आरोपीविरोधात सत्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

नवी मुंबई पोलिसांनी अभय कुरुंदकर याचा जवळचा मित्र महेश फळशीकर याला पुण्यातील कात्रज परिसरातून तीन दिवसापूर्वी  अटक केली. त्याच्या अटकेनंतर तपासाला आणखी गती मिळाली. फळणीकरची चौकशी केल्यानंतर अनेक महत्वाच्या बाबी उघड  झाल्या आहेत. त्यामध्ये सचिन पाटील,  कुंदन भंडारी आणि महेश फळणीकरने मिळून अभय कुरूंदकरला अश्विनी हत्या प्रकरणात मदत केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. अटकेत असलेला सचिन पाटील, भंडारी कारचालक आणि महेश फळणीकरचे मोबाईल लोकेशन मिरारोड, भाईंदर आणि वसई या परिसरात होते. त्याच दिवशी एपीआय अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती. कुरूंदकरच्या घरात भिंतीवर पोलिसांना रक्ताचे डाग आढळून आले होते. म्हणजेच मिरारोड येथील कुरूंदकरच्या घरी हत्या करून कटरने मृतदेहाचे तुकडे करून ते गोणीत भरून वसईच्या खाडीत फेकल्याचा संशय यापूर्वी तपास पथकाने व्यक्त केला होता. एवढंच नाहीतर अभय कुरूंदकरने हत्या झाल्यानंतर १५ दिवस भाईंदर आणि वसईच्या खाडी किनारी फेरफटका मारला होता. तेथील मच्छिमारांना याठिकाणी एखादी महिलेचा मृतदेह आढळला का अशी विचारणा ही केली होती. हत्या झाली त्यादिवशी चारही आरोपी आणि अश्विनी बिद्रे यांचे मोबाईल लोकेशन मिरारोड आणि भाईंदर असल्याचे याआधीच तपासात निष्पन्न झाले होते. कूंरूदकरच कारचालक हा भाईंदर येथील हॉटेल बंटास येथे ११ व १२ एप्रिल रोजी मुक्कामाला नसल्याचे पोलीसांनी हॉटेलच्या रजिस्टरच्या नोंदी तपासल्यानंतर उघड झाले आहे. मात्र याप्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. हा तपास सहायक पोलिस आयुक्त गुन्हे करत आहेत. 

चौथ्या आरोपीच्या अटकेमुळे कुरुंदकर आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. यामुळे याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकलेल्यांची संख्या चारवर गेली आहे. भंडारी आणि फळणीकर यांची एकत्रित चौकशी करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात  केली होती. आजच गुरूवारी  न्यायालयाने दोघांना दिलेली कोठडी संपली.  

आरोपी अभय कुरुंदकर याचा ड्रायव्हर कुंदन भंडारी याला पोलिसांनी कांदिवलीमधून अटक केल्यानंतर आपल्या पापाचा घडा भरल्याची जाणीव कुरूंदकरला लागली  होती. कुरुंदकर याच्या कॉल डिटेल्सवरुन कुंदनला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून फळणीकरचे नाव पुढे आले होते. लाकूड कापण्याचे कटर मशीनचा शोध घेत असतानाच फळणीकर पोलिसांच्या हाती लागला. ही माहिती कळताच कुरूंदकरने या गुन्ह्यातुन सुटका होण्याची आशा सोडल्याचे एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने सांगितले.  महेश फळणीकर हा अभय कुरुंदकर याचा बालपणीपासूनचा मित्र आहे. फळणीकर कुरुंदकरचे सर्व व्यवहार पहात होता.