Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रे हत्या : आणखी दोघांना अटक ?

अश्विनी बिद्रे हत्या : आणखी दोघांना अटक ?

Published On: Mar 03 2018 6:55PM | Last Updated: Mar 03 2018 6:57PMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

नागरी हक्क संरक्षण ठाणे ग्रामीण विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या कुंद भंडारी आणि महेश फळशीकर या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत ९ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता पुन्हा या दोघांना तपासासाठी भाईंदर आणि वसई येथे घेऊन जाण्यात आले होते.

प्रकरणात आणखी दोन जणांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. महिला एससीपी संगीता अल्फोन्सो या स्वताः फळशीकरची चौकशी करत आहेत. एससीपी अल्फोन्सो यांची राज्य सरकारने नव्याने नियुक्ती केल्यानंतर ३९ दिवसात या तपासाला गती आली. 

भाईंदर येथील कुरुंदकरच्या घरातील फ्रीज तपास पथकाने सील केला आहे. फॉरेन्सिक तज्ञांनी बारकाईने फ्रीजमधील काही महत्वाचे नमुने तब्यात घेतले आहेत. या शिवाय इतर काही महत्वाच्या बाबी राहत्या घरातून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. अटकेत असलेल्या भंडारी आणि महेश फळशीकरची चौकशी ७ ते ८ मार्च दरम्यान पुर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच अभय कुरूंदकरला पुन्हा चौकशीसाठी न्यायालयात अर्ज करून ताब्यात घेतले जाणार आहे. यानंतर ठोस पुराव्यानिशी एकत्र चौकशी केली जाणार असल्याचे तपास पथकाने सांगितले. 

यामुळे सध्या कुरूंदकरला तपासात घेतले जात नाही. पोलिसांनी पुन्हा  या तिघांचे कॉल डिटेल्स मागवले आहेत. सीडीआर काढला होतात. त्यामध्ये सर्वाधिक संभाषण हत्याच्या दिवशी भंडारी, कुरूंदकर आणि फळशीकर यांच्यात झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत वेगवेगळे मोबाईल सीमकार्ड बदलण्यात आल्याची पुढे येत आहे.

नवी मुंबई गुन्हे अन्वेषण पोलिसांनी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या भाईंदरमधल्या घरी जाऊन त्याचा फ्रीज सील केला. अश्विनी बिद्रेच्या हत्येनंतर तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. या फ्रीजमध्ये काही केसही सापडले असून, ते केमिकल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

११ आणि १२ एप्रिलच्या रात्री अश्विनी बिद्रेच्या मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत टाकण्यात आले होते. तर १२ आणि १३ एप्रिल दरम्यान अभय कुरुंदकर, महेश फळशीकर आणि कुंदन भंडारी या तिघांचं मोबाईल लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

दरम्यान, अश्विनी बिद्रेचा मृतदेह शोधण्यासाठी नौदलाची मदत घेतली जाणार आहे. सोमवारी ही शोध मोहीम घेतली जाणार आहे. अश्विनी बिद्रेचा खून झाला असल्याची कबुली पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याचा अटकेत असलेला खासगी चालक कुंदन भांडारी आणि त्याचा मित्र महेश फणीकर यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. या दोघांनाही अनुक्रमे ५ आणि ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.