Fri, Mar 22, 2019 01:35
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रे प्रकरण : नौदलाच्या मदतीने मृतदेहाची शोध मोहिम

अश्विनी बिद्रे प्रकरण : नौदलाच्या मदतीने मृतदेहाची शोध मोहिम

Published On: Mar 05 2018 1:30PM | Last Updated: Mar 05 2018 1:30PMनवी मुंबई: प्रतिनिधी 

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आज नौदलाच्या मदतीने वसई व भाईंदर खाडीत मृतदेहाची शोध मोहिम घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अटकेत असलेल्या अभय कुरूंदकरच्या फार्महाऊसची रविवार तपास पथकाने झाडाझडती घेतली. शिवाय कटरच्या शोधात पोलीस पथक कामाला लागले आहे. ज्या कटरच्या साहाय्याने अश्विनी बिद्रेची हत्या करण्यात आली ते कटर महत्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करावे लागणार आहे. मृतदेह ज्या पेटीत कोंबून फेकला ती हाताला लागण्यासाठी मोठी शोध मोहिम तपास पथकाने  नौदलाच्या मदतीने घेण्याचा निर्णय घेतला. ही मोहीम सुमारे तीन दिवस चालणार असल्याचे सूत्राने सांगितले. तब्बल 19 महिन्यापुर्वी मृतदेहाचे तुकडे करण्यात  आले होते. तेव्हा पासून पेटी गाडीत फेकली आहे. ती मिळणे अवघड असले तरी तपासात ती मिळणे महत्वाचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

तपास शतकातील दोन एससीपी यावेळी कुंदन भंडारी आणि महेश फळशीकर सोबत खाडी किनारी उपस्थित असणार आहेत. सोबत सरकारी कर्मचारी म्हणून तीन पंच बरोबर असतील असे सांगण्यात येत आहे.