Mon, Nov 19, 2018 07:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : कुरूंदकरच्या वकिलांनी घेतला जामीन अर्ज मागे

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : कुरूंदकरच्या वकिलांनी घेतला जामीन अर्ज मागे

Published On: Jun 25 2018 5:28PM | Last Updated: Jun 25 2018 6:31PMनवी मुंबई : प्रतिनिधी

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या जामीन अर्जावर आज (25 जून) अलिबाग जिल्हा सत्र न्यायलयात सुनावणी होणार होती. परंतु, न्यायाधीश कांबळे यांच्या न्यायलयात होणार्‍या सुनावणी पूर्वीच आरोपीचे वकील अंकुश मोरे यांनी कुरूंदकरचा जामीन अर्ज मागे घेतला. यामुळे सुनावणी झालीच नाही. किंबहुना जामीन मिळेल या आशेवर असलेल्या अभय कुरूंदकरच्या आशेवर पाणी फिरले. 

उद्या मुंबई हायकोर्टात दुसरा आरोपी राजेश पाटील याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यावेळी तपास अधिकारी एससीपी संगीता अल्फोन्सो स्वत: न्यायालयात हजर राहणार आहेत. जामीन फेटाळण्यात यावा यासाठी तपास अधिकारी अल्फोन्सो यांनी तयारी केली आहे. 

13 एप्रिलला अलिबाग सत्र न्यायालयाने राजेशचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज  केला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने अलिबाग न्यायलयात जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी एसीपी संगिता शिंदे-अल्फान्सो व क्राईम एसीपी निलेश राऊत उपस्थित होते.