Sun, Jul 05, 2020 22:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फूट पाडणाऱ्यांचा डाव हाणून पाडा : अशोक चव्हाण

फूट पाडणाऱ्यांचा डाव हाणून पाडा : अशोक चव्हाण

Published On: Jan 02 2018 2:49PM | Last Updated: Jan 02 2018 2:57PM

बुकमार्क करा
मुंबईः प्रतिनिधी

भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवीअसून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करित आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा.असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगाव येथे हजारो लोक येतात, अभिवादन करतात. यंदा २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोक मोठ्या संख्येने येणार होते. पोलीस प्रशासनाला याची पूर्ण कल्पना होती. आरएसएसशी संबंधित लोकांनी चार पाच दिवसांपासून या परिसरात अफवा पसरवून परिस्थिती बिघडवण्याचे काम केले होते. याची पूर्ण कल्पना असतानाही पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत वा पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला नाही. त्यामुळेच पुण्यातून आलेल्या काही समाजकंठकांनी हैदोस घालून हिंसाचार केला आणि पोलिसांनी काहीही कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली अशी माहिती स्थानिकांकडून मिळतेय. सरकारने  या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.

दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाघविघातक प्रवृत्तीचा डाव असल्याचे कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारधारेला मानणा-या सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने लढा देऊन हा कुटील राजकीय डाव हाणून पाडण्याची आवश्यकता आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.