Sat, Aug 17, 2019 17:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासदार हरवला ! अरविंद सावंत यांच्याविरोधात पोस्‍टरबाजी

खासदार हरवला ! अरविंद सावंत यांच्याविरोधात पोस्‍टरबाजी

Published On: Mar 16 2018 9:45AM | Last Updated: Mar 16 2018 9:45AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात शहरात बॅनरबाजी सुरू असल्याने सावंत चर्चेचा विषय बनले आहेत. मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गुरूवारी अरविंद सावंत यांच्या विरोधात आपण यांना पाहिलंत का ? या मथळ्याखाली बॅनर लावण्यात आली होती.आपण यांना पाहिलंत का ? जिथे असतील तिथून लवकर निघून या. आम्‍ही तुम्‍हाला काही बोलणार नाही, असा मजकूर लिहलेले बॅनर लावून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुधांशु भट यांच्याकडून हे बॅनर्स लावण्यात आले होते

या बॅनरमुळे शहरात राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर शिवसैनिकांकडून उतरवण्यात आले असून आता राजकीय वाद पुन्‍हा उफाळून येणार असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.