Wed, Jul 24, 2019 06:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › झोपड्यांचे क्षेत्रफळ आता ३० चौरस मीटर

झोपड्यांचे क्षेत्रफळ आता ३० चौरस मीटर

Published On: Jan 11 2018 1:30AM | Last Updated: Jan 11 2018 1:07AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राजकीय कारणाने झोपडपट्ट्या नियमित करण्याची मुदत वारंवार वाढविण्यात आली. आता झोपड्यांचे क्षेत्रफळही केंद्र सरकारशी सुसंगत धोरण ठेवण्यासाठी  वाढविण्यात येणार आहे. मात्र त्याचे परिणाम नेमके काय होणार ? याचा अभ्यास करण्यासाठीची सरकारने समिती नेमली आहे. 

राज्यात झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना राबविण्यात आली. त्यानुसार प्रत्येेक झोपडीला 20. 90 चौरस मीटर म्हणजे 225 चौरस फुटाची जागा देण्यााचा निर्णय घेण्यात आला. मात्र नंतर यामध्ये बदल करून 25 चौरस मीटर म्हणजे 269 चौरस फुटाची जागा देण्याचा  निर्णय घेतला गेला. 

केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे या योजनेत प्रधानमंत्री आवास योजनेखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 30 चौरस मीटर चटईक्षेत्राचे  घर देण्याचाही निर्णय घतला आहे . झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत राज्याचे धोेरण हे केंद्र सरकारशी सुसंगत असावे याकरिता राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेततील झोपड्यांचे आकारमान वाढविण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी याचा नेमका काय परिणाम  होईल ? याचा अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

झोपड्यांच्या आकारमानात वाढ करायची झाल्यास सध्या मंजूर असलेल्या व व नव्याने सादर होणार्‍या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांवर होणार्‍या विविध परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. मुबंई महापालिका आयुक्तांनी प्राधिकृत केलेले अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगर प्राधिकरणाने प्राधिकृत केलेले अतिरिक्त आयुक्त हे त्याचे सदस्य असून झोपडपट्टी प्राधिकरणाचे उपसंचालक त्याचे सदस्य सचिव आहेत. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील यासंबंधिचा अहवालही एकत्रित अहवालात समाविष्ट करावा. त्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडच्या झोपडपट्टी प्राधिकरणाच्या   मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनाही समितीने निमंत्रित सदस्य म्हणुन निमंत्रित  करण्याच्या सुचनाही सरकारने दिल्या आहेत.