Thu, Aug 22, 2019 11:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकार अपयशी ठरले; विरोधकांचा चहपाणावर बहिष्कार

सरकार अपयशी ठरले; विरोधकांचा चहपाणावर बहिष्कार

Published On: Feb 25 2018 4:27PM | Last Updated: Feb 25 2018 4:27PMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील जवळपास 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची  जाहीर केली, पण शेतकऱ्यांचा हातात कर्जमाफीची रक्कम अद्याप जमा झाली नाही. गारपीट, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई अद्याप दिलेली नाही. न्यायासाठी मंत्रालयात येऊन शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व  संध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहपाणाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

सोमवार 26 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विदगीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची महत्वपूर्ण बैठक विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.या बैठकीला विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे , राष्ट्रवादीचे अजित पवार, शेकापचे गणपतराव देशमुख, जयंत पाटील, पीआरपीचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, सपाचे आ. अबू आझमी आदी नेते उपस्थित होते.

कमला मील आग प्रकरण, भीमा कोरेगाव घटना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराजांचे स्मारक,  फसलेली कर्जमाफी योजना, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी, आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, या सर्व मुद्यांवर विधीमंडळ अधिवेशनात आक्रमक होऊन सरकारला जाब विचारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.