Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 91 टक्केवाल्यांनाही दुसर्‍या यादीत प्रवेश नाही

91 टक्केवाल्यांनाही दुसर्‍या यादीत प्रवेश नाही

Published On: Jul 20 2018 1:40AM | Last Updated: Jul 20 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी

अकरावीला दुसर्‍या यादीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी घेताना सर्व अल्पसंख्याक महाविद्यालयांतील जागा ज्या -त्या महाविद्यालयांना परत करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने हे आदेश देण्यापूर्वी अल्पसंख्याकांच्या खुल्या जागांमध्ये जमा झालेल्या बहुसंख्य रिक्‍त जागांवर विद्यार्थ्यांनी दुसर्‍या यादीसाठी नंबर लागावा म्हणून अर्ज भरला त्यानंतर न्यायालयाने जागा परत करण्याचा हा निर्णय दिल्याने त्या जागा काढल्याने अर्ज केलेल्या अनेक नव्वदहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या यादीत चक्‍क दुय्यम दर्जाचे महाविद्यालय मिळाले आहे. 

अकरावी प्रवेशाचा गोंधळ दरवर्षी नित्याचा झाला आहे. यंदा अल्पसंख्याक कोट्यातील जागांच्या गोंधळाने डोके वर काढले आहे. दुसर्‍या यादीत अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना अक्षरशः कमी आणि दुय्यम दर्जाचे महाविद्यालय अलॉटमेंट झाल्याने चर्नीरोड कार्यालयाच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. मिठीबाई, जयहिंद, एचआर, एनएम, पोद्दार अशा नामवंत महाविद्यालयांतील जागा फुल्‍ल झाल्यामुळे या महाविद्यालयातील खुल्या वर्गासाठी दुसरी यादी लागलीच नाही. 90 ते 95 टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाले होते. या विद्यार्थ्यांना तिसर्‍या किंवा चौथ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी ती संधी सोडून दुसर्‍या यादीत आणखी वरचे व चांगले महाविद्यालय मिळवण्यासाठी रिक्‍त जागा पाहून प्रवेश अर्ज भरले मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे ज्या अल्पसंख्याक कोट्यातून जागा खुल्या वर्गात जमा झाल्या होत्या त्या पून्हा परत करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाला देण्यात आले. दुसर्‍या यादीची घोषणा केलेल्या दिवशीच हा निर्णय आल्याने त्या सर्वच रिक्‍त जागा परत करण्यासाठी दुसरी यादी पुढे ढकलण्यात आली. मात्र या यादीत ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी चांगल्या दर्जाचे महाविद्यालय मिळण्याची आशा व्यक्‍त केली होती ती धुळीस मिळाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना पूर्वीच्या महाविद्यालयापेक्षा सातव्या किंवा आठव्या क्रमांकाचे दुय्यम दर्जाचे महाविद्यालय देवून दुसर्‍या यादीत बोळवण झाली आहे. त्यामुळे पालकांनी अकरावीच्या प्रवेशाच्या नावाने संताप व्यक्‍त केला आहे. त्यामुळे या यादीत मोठा गोंधळ झाला आहे. 

अल्पसंख्याक कोट्यातील जामा जमा झाल्या होत्या त्या पाहून मी महाविद्यालयात रिक्‍त जागा पाहून प्रवेश घेतला त्यात माझी काय चूक निर्णय नंतर बदलला आहे. मला 91 टक्के मी मेहनतीने मिळवलेेले आहेत. आता मला आठव्या क्रमांकाचे महाविद्यालय दिले जात आहे. मी काय करु असे दहिसरला राहणारी मोनिका विद्यार्थींनी सांगत होती. अशा तब्बल 23 विद्यार्थ्यांनी तक्रारीचे पत्र शिक्षण उपसंचालकांकडे दिले आहे. असे अनेक विद्यार्थी शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.

पहिल्या यादीत तब्बल 1 लाख 40 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रात्प झाले होते. त्यापैकी 70 हजार 63 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. याबाबतचे सविस्तर माहिती चौकटीमधून देण्यात आली आहे.

प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी असे घ्यावा प्रवेश

विद्यार्थ्याने http://mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावर जावून Centralized -llocation Result 2 या ऑप्शनला क्लिक करून आपला अप्लिकेशन क्र. टाकावा. त्यानंतर विद्यार्थ्याला अलोटमेंट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती दिसेल. जर विद्यार्थ्याला त्याच्या पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलोट झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांनी 21 जुलै पर्यंत प्रत्यक्ष संबधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 2 ते 10 पसंतीक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय अलोट झाले असल्यास त्या विद्यार्थ्यास प्रवेश निश्चित करावयाचा असेल त्यांनी विहित कालावधीत संबधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करून घ्यावा. 

ज्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या गुणवत्ता यादीसाठी वाट पहावयाची असेल त्यांनी त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलवायचे असतील त्या विद्यार्थ्यांनी 23 व 24 जुलै  या कालावधीत आपले पसंतीक्रम बदलून त्याची प्रिंट काढून ठेवावी. व ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलवायचे नसतील त्याचे पूर्वीचेच पसंतीक्रम ग्राह्य धरून अलोटमेंट करण्यात येईल.