Fri, Jul 19, 2019 00:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंजली दमानिया यांना अश्लील फोन 

अंजली दमानिया यांना अश्लील फोन 

Published On: Apr 28 2018 7:27PM | Last Updated: Apr 28 2018 7:21PMमुंबई : प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना वेगवेगळ्या नंबरवरुन अश्लील फोन येत आहेत. यासंबंधीची माहिती दमानिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊट दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी पत्रक चिकटवून आपला मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आल्याचा आरोप दमानियांनी ट्विटरवरुन केला आहे.

अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की,  'हे अत्यंत किळसवाणं असून राजकारणी कुठल्या थराला पोहचू शकतात याचं हे उदाहरण आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनोळखी व्यक्तीकडून मला फोन येत आहेत. या व्यक्ती जळगाव, भुसावळ, सुरत, गोरखपूरमधील आहेत. नुकताच मला भुसावळला जाणाऱ्या पॅसेंजरमधून फोन आला. ही ट्रेन आता चाळीसगावला आहे' दमानिया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक असलेले पत्रक असून यावर 'अंजली से खट्टी मिठी बाते करो. फ्री फ्री फ्री' असे लिहिले आहे. 

अंजली दमानिया घटलेल्या या प्रकाराबाबत ट्वीट करत यांची माहिती रेल्वे मंत्रालय, मंत्री पियुष गोयल, मुंबई पोलिस आणि पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना दिली. या प्रकाराची  रेल्वे मंत्रालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.