Mon, Jul 22, 2019 03:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जाब विचारला म्‍हणून सरदारजींनी काढली तलवार 

जाब विचारला म्‍हणून सरदारजींनी काढली तलवार 

Published On: Feb 02 2018 10:42AM | Last Updated: Feb 02 2018 10:41AMकल्याण : वार्ताहर

भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याने जाब विचारणाऱ्या केडीएमसी बस ड्रायव्हरवर ट्रक चालकाने मारण्यासाठी तलवार काढल्‍याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ट्रक चालक हरपित सिंग आणि त्याचा क्लिनर गुरपीत सिंग या दोघंना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. 

शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान केडीएमटीची  उसटणे कल्याण ( एमएच 05 आर 1241) ही बस  कल्याणच्या दिशेने नेतीवली नाक्‍याकडे येत असताना हरपित याने समोरून भरधाव वेगाने ट्रक  (P.B.46.M.4907) आणला.  खचाखच भरलेल्या बस मधील प्रवाश्यांच्या जीवावर बेतले असते म्हणून केडीएमटी बसचालक विलास तलवारे यांनी  हरपितला जाब  विचारला. यावेळी संतप्त झालेला हरपित सिंग व त्याचा क्लिनर गुरपीत सिंग  या दोघांनी ट्रक मधील तलवार काढून बस चालकाला मारण्यासाठी धाव घेतली. थरारक प्रसंग भर रस्त्यात घडल्याने नेतीवली नाका येथे एकच खळबळ उडाली व वाहतूक कोंडी झाली. मात्र, बस मधील प्रवाश्यांनी प्रसांगावधन राखून वेळीच मोठ्या  घटनेला आवर घातला व संतापलेल्या दोघा सरदारजी कडून सुटका केल्याने बस चालकाचा जीव वाचला. 

या घटनेची माहिती समजताच परिवहन उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. या प्रकरणी चालक हरपित सिंग व त्याच्या क्लीनरला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.