Tue, May 21, 2019 00:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमिताभ बच्चन, पांड्या अन् विरुष्का....

अमिताभ बच्चन, पांड्या अन् विरुष्का....

Published On: Dec 28 2017 8:41PM | Last Updated: Dec 28 2017 8:41PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

क्रिकेटमधली रन मशीन, अशी ओळख निर्माण केलेला स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे विवाहबंधनात अडकले. लग्नाचे सेलिब्रशनही धुमधडाक्यात झाले. दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली, तर मुंबईत सिनेस्टार, क्रिकेटरांनी हजेरी लावली होती. तर बॉलिवुडचे बिग बी अमिताभ बच्चन हे देखील या सोहळ्यास उपस्थित होते. 

बिग बी अमिताभ बच्चन यांनी विराटचे रिसेप्शन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याशी झालेल्या बैठकीचे फोटो शेअर केले आहेत. या दोघांची भेट आपल्यासाठी खूपच आनंददायी होती, असे बच्चन यांनी म्हटले आहे. आपल्या देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या आणि भारतीय स्टार क्रिकेटपटूंना भेटून मला अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या ट्टिटला सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांनी भरभरून लाईक देखील दिल्या आहेत.