होमपेज › Mumbai-Thane-Raigad › See Pics : अमित ठाकरे -मिताली यांचा साखरपुडा 

See Pics : अमित ठाकरे -मिताली यांचा साखरपुडा 

Published On: Dec 11 2017 2:02PM | Last Updated: Dec 11 2017 3:33PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित आणि त्यांची बालपणीची मैत्रिण मिताली बोरुडे यांचा साखरपुडा सोहळा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि आज त्यांचा साखरपुडा संपन्न झाला. लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

अमित ठाकरे यांनी त्यांच्या आजच्या लूकचा एक फोटो फेसबूकवरही शेअर केला आहे. ‘घरची नवी बॉस’ अशा मजकूरासह हा फोटो त्यांनी शेअर केला आहे. खास गोष्ट म्हणजे आज राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवस ही आहे.त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा समारंभ आयोजित करण्यात आला. या साखरपुड्याला ठाकरे कुटुंबीय आणि काही निवडक मित्रपरिवार उपस्थित होता.
 

Image may contain: 2 people, people standing

Image may contain: 9 people, people standing

Image may contain: 4 people, people smiling, indoor

Image may contain: 2 people

Image may contain: one or more people, people standing, shoes and outdoor

Image may contain: 2 people, people smiling, mountain, sunglasses, outdoor and nature