Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘अंबेनळी घाटातील मृतांच्या नातेवाईकांना विद्यापीठात नोकरी’  

‘अंबेनळी घाटातील मृतांच्या नातेवाईकांना विद्यापीठात नोकरी’  

Published On: Jul 29 2018 8:37PM | Last Updated: Jul 29 2018 8:36PMमहाड : प्रतिनिधी  

शनिवारी सकाळी पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात झालेल्‍या अपघातामधे मृत्यूमुखी पडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावर दापोली कृषी विद्यापीठामध्ये सेवेत रुजू करून घेण्याचा प्रस्ताव राज्यपालांनी मान्य केल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नामदार अनंत गीते यांनी दिली. दापोली येथे आज कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या भेटी प्रसंगी दिली असून मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना शिवसेना संघटनेच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याची त्यांनी घोषणा केली आहे.  

शनिवारच्या या दुर्घटनेनंतर रविवारी दुपारी नामदार अनंत गीते यांनी दापोली कृषी विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांबरोबर या संदर्भात चर्चा केली. या प्रसंगी दापोली कृषी विद्यापीठाचे मानद कुलगुरू डॉ. भट्टाचार्य, संचालक डॉ. भावे, डॉ. नारखडे आदिप्रमुख अधिकारी व कृषी विद्यापीठाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

दापोली कृषी विद्यापीठाच्या या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर तसेच मानद कुलगुरू बरोबर झालेल्या चर्चेमध्ये ना. गीते यांनी मृतांच्या नातेवाईकांना दापोली कृषी विद्यापीठात अनुकंपा तत्त्वावर सेवेत रुजू करून घेण्याचा महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. विद्यासागर राव यांना दिलेला प्रस्ताव त्यांनी मंजूर केला असून, त्यांनी तातडीने या संदर्भातील कार्यवाही करण्याची सूचना दिल्याचे कृषी विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. 
अंबेनळी घाटातील दापोली कृषी विद्यापीठाच्या तीस मृतांच्या नातेवाईकांना शिवसेना संघटनेच्या वतीने प्रत्येकी एक लक्ष रुपयांची मदत यावेळी आमदार अनंत गीते यांनी घोषित केली आहे.