Mon, Jul 15, 2019 23:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी ग्रीन कॉरिडॉर

रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी ग्रीन कॉरिडॉर

Published On: Jul 10 2018 8:36PM | Last Updated: Jul 10 2018 8:36PMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपारा ते वसई दरम्यान प्रचंड पावसाने अडकून पडलेल्या बडोदा एक्स्प्रेस मधल्या 1700 ते 2000 प्रवाशांची पालघर जिल्हा प्रशासनाने एन डी आर एफ च्या जवानांच्या सहाय्याने सुटका केली. या प्रवाशांना नायगाव स्टेशनपर्यंत आरटीओच्या मदतीने खासगी बसेसची व्यवस्था करून आणण्यात आले. तसेच त्यांची जेवणाची सोय करून देण्यात आली. हतबल झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना देखील यामुळे दिलासा मिळाला.

या रेस्क्यु ऑपरेशनसाठी एन. डी. आर. एफच्या जवानंना कुठल्याही अडथळ्याविना नालासोपारा पर्यंत पोहचावे म्हणून ठाणे-पालघर पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. एन. डी. आर. एफचे एकूण 42 जवान होते. त्यांच्याकडे 6 बोटी होत्या. त्यातील 3 बोटीतून मिठाघर येथे अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात  आली, त्यांना अण्णासाहेब वर्तक कॉलेज येथे सुखरूप पोहचविण्यात आले. वसई पालिका, जीवदानी संस्था, या सर्वांनी या कामात त्यांना मदत केली.