Wed, Jul 24, 2019 08:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात ६० 'पॅड व्हेंडिंग मशीन' बसविणार : आदित्य ठाकरे

राज्यात ६० 'पॅड व्हेंडिंग मशीन' बसविणार : आदित्य ठाकरे

Published On: Feb 16 2018 5:18PM | Last Updated: Feb 16 2018 6:34PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट रिलीज झाला आहे. यात महिलांच्‍या मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन किती महत्त्‍वाचं आहे, हे दाखवण्‍यात आलं आहे. आता मुंबईच्‍या सेंट्रल एसटी डेपोत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्‍या सहकार्याने 'पॅड व्‍हेंडिंग मशीन' बसवण्‍यात आले आहे. मुंबई सेंट्रल येथील एस. टी. स्‍थानकावर गुरूवारी अक्षय कुमारच्‍या हस्‍ते या मशीनचे उद्‍घाटन करण्‍यात आले. राज्यात ६० सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसविणार असल्‍याची माहिती आदित्‍य ठाकरे यांनी ट्‍विटरवरून दिली. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, दक्षिण मुंबईचे खासदार ए. जी. सावंत उपस्थित होते.    

याप्रंसगी अक्षयच्‍या चाहत्यांनी गर्दी गेली होती. एस. टी. डेपोमध्ये बसविण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनमुळे महिलांना याचा जास्तीत जास्त उपयोग होईल, असे ट्‍विट आदित्‍य ठाकरे यांनी केले असून कार्यक्रमाचे काही फोटोजही पोस्‍ट केले आहेत. आदित्‍य ठाकरे यांनी आणखी एक ट्‍विट केले आहे. त्‍यात त्‍यांनी म्‍हटले आहे, 'मुंबई सेंट्रल येथील एस. टी. डेपोमध्ये अक्षय कुमारसोबत पहिल्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनचे उद्‍घाटन केले. राज्यात आम्ही ६० सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसविणार आहोत. या पुढाकारासाठी मी अक्षयकुमार यांना धन्यवाद देतो.' 
 

मुंबई सेंट्रल येथील एस टी डेपोमध्ये @akshaykumar जीं सोबत पहिल्या सेनेटरी पॅड व्हेंडिंग मशीनचे उदघाटन केले, राज्यात आम्ही ६० सेनेटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसविणार आहोत. या पुढाकारासाठी मी अक्षयकुमार जींना मन:पूर्वक धन्यवाद देतो. pic.twitter.com/Hej4HI8MkI

— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 15, 2018

Placed a sanitary pad vending machine at Mumbai Central ST Bus Depot today, hoping to place more across the State and eventually hopefully the whole country. Thank you @AUThackeray for your support 🙏🏻 pic.twitter.com/MghqrEEK9Q

— Akshay Kumar (@akshaykumar) February 15, 2018