Sat, Aug 24, 2019 21:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणात 'सेक्स रॅकेट'चा भांडाफोड; दलाल अटकेत

कल्याणात 'सेक्स रॅकेट'चा भांडाफोड; दलाल अटकेत

Published On: Feb 22 2018 5:12PM | Last Updated: Feb 22 2018 5:15PMकल्याण : वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये सेक्‍स रॅकेटचे प्रकार उघडकीस येत आहेत. कल्याणमध्ये पुन्‍हा एका महिला दलालाला अटक करण्यास एएचटीसी आणि खडाकपाडा पोलिसांना यश आले आहे. रुपा राठोड असे या दलालाचे नाव असून तिच्यासोबत असणार्‍या तीन मुलींची सुटका केली आहे. 

दरम्यान, उल्‍हासनगर येथे राहणारी रुपा राठोड ही महिला सेक्‍स रॅकेट चालवत असल्याची माहिती एएचटीसीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्याकडे बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. कल्याणमधील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरवले. बुधवारी सायंकाळी रुपा तीन मुलींसह त्याठिकाणी आली असताना तिला अटक केले. तसेच तिच्यासोबत असणार्‍या तीन मुलींची सुटका केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.