Tue, Jun 02, 2020 19:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बालनाट्याच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन 

बालनाट्याच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन 

Published On: Feb 05 2018 12:02PM | Last Updated: Feb 05 2018 12:43PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मराठी बालनाट्याच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बालनाट्य चळवळ निष्ठेने चालवून बालरंगभूमिला स्वताचे वेगळे स्थान देण्यात यशस्वी ठरलेल्या त्या महान कलावती होत्या. 

सुधा करमरकर यांची अनेक नाटके अजरामर झाली. त्यापैकीच एक ‘मधुमंजीरी’ हे नाटक विशेष गाजले. त्या लिटील थिएटर ही रंगभूमी सळवळ त्यांनीच स्थापन केली. आविष्कार, छबिलदास या चळवळींमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय होत्या.  

सुधा करमरकर यांचे घराणे मूळचे गोव्याचे होते. पण त्यांचा जन्म मुंबईतच १९३४ साली झाला. वडील तात्या आमोणकर हे गिरगांव-मुंबईतील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधाबाईंना घरातूनच नाट्य कलेचे बाळकडू मिळाले होते. 

सुधाताईंनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर, दामू केंकरे यांनी त्यांना मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये दाखल करून घेतले. मो. ग.रांगणेकरांच्या ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना नृत्यकुशलनायिकेची, रंभेचीच भूमिका मिळाली, आणि त्यांची ती भूमिका गाजली. 

पुढील नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन 'बालरंगभूमी' या संकल्पनेचा अभ्यास केला. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली, आणि तिथूनच त्यांनी नाटकांमध्ये मुलांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार हे ठरवूनच त्या भारतात परतल्या.