Sun, Jul 21, 2019 12:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  श्रीदेवींचे पार्थिव आज मुंबईत आणणार, पवन हंस स्‍मशानभूमीत अंत्यसंस्‍कार

श्रीदेवींचे पार्थिव आज मुंबईत आणणार, पवन हंस स्‍मशानभूमीत अंत्यसंस्‍कार

Published On: Feb 26 2018 8:17AM | Last Updated: Feb 26 2018 8:23AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री श्रीदेवी यांचे रविवारी दुबईत हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्‍यांचे पार्थिव आज दुपारपर्यंत मुंबईत आणण्यात येणार आहे. पार्थिव मुंबईत आणल्‍यानंतर मुंबईतील पवन हंस स्‍मशानभूमीत त्‍यांच्यावर अंत्यसंस्‍कार करण्यात येणार आहेत. 

दुबईतील काही कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे त्यांचे पार्थिव कुटुंबीयांकडे देण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. श्रीदेवी यांचे पार्थिव उद्योगपती अनिल अंबानी यांच्या खासगी जेट विमानाने (एम्ब्रेअर-१३५ बीजे) दुबईतून मुंबईत आणले जाणार आहे.  

या विमानाची १३ आसनक्षमता असून, श्रीदेवी यांचे पार्थिव घेऊन कुटुंबीय सोमवारी दुपारच्या सुमारास मुंबईत पोहोचतील. श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चाहत्‍यांनी कालपासून त्‍यांच्या घरासमोर प्रचंड गर्दी केली आहे. 

संबंधित बातम्‍या 

श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या

हवाहवाईच्या जाण्याने चाहत्यांना सदमा

श्रीदेवीच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टेम दुबईतच होणार 

श्रीदेवीची अकाली एक्झिट, बॉलिवूडवर शोककळा

ब्लॉग : ‘चांदणी’ गहरा ‘सदमा’ दे गई

कोणाच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या?

...आणि आईची इच्छा अपूर्णच राहिली