Tue, Nov 20, 2018 03:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवीच्या सौंदर्याचे रहस्‍य 

श्रीदेवीच्या सौंदर्याचे रहस्‍य 

Published On: Feb 25 2018 11:59AM | Last Updated: Feb 25 2018 11:58AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मोहक सौंदर्याचा मोठा चाहतावर्ग होता. वयाची ५४ वर्ष झाली तरी त्‍यांच्या सौंदर्याच्या जादूने प्रत्‍येकाला कायम भूरळ घातली होती. मोहक र्सांदर्य आणि अनोख्या फॅशनमुळे बॉलीवूडमध्ये त्‍यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. एका मुलाखतीमध्ये त्‍यांनी आपल्‍या फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्‍य उलगडले होते.  

यावेळी त्‍यांनी सांगितले होते की, ‘‘माझे सौंदर्य आणि फिटनेस मेंन्टेंन ठेवण्यासाठी मी काही काटेकोर नियमांचे पालन करते, असे नियम मी स्‍वत:च माझ्यावर घालून घेतले आहेत आणि ते तेवढ्याच काटेकोरपणे पाळतेही. चांगल्‍या बल्ड सर्कुलेशनसाठी रोज डोक्‍याला मालिश करते तसेच जास्‍त केमिकल असणाऱ्या सौंदर्य प्रसादणांचा वापर करत नाही.’’

रात्री झोपताना मेकअप करून झोपणे त्‍यांना आवडत नव्हते. त्‍यांचे म्‍हणणे होते की, झोपताना मेकअप केले तर त्‍याचा त्‍वचेवर वाईट परिणाम होतो. 

श्रीदेवी दिवसातून पाच वेळा थोडे-थोडे जेवण करत असत. फिटनेससाठी त्‍या रोज योगा करत, तसेच त्‍या पाणीही खूप पित असत. त्‍याबरोरच त्‍यांचे असे म्‍हणणे होते की, आपण आतून खुश असलो तर ते आपल्‍या चेहऱ्यावरही दिसते. त्‍यासाठी त्‍या नेहमी सकारात्मक विचार करत असत आणि स्‍वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्‍न करत. आपल्‍या कुटुंबियांसमवेत वेळ घालवणे आणि टेनिस खेळणे त्‍यांना आवडत असे. 

श्रीदेवी आपल्‍या दिवसाची सुरुवात गरम पाणी, मध आणि लिंबूपाणी पिऊन करत. नाष्‍ट्याआधी त्‍या भाजीपाल्‍यांचा ज्‍यूस पित असत. जास्‍त मेकअप करणे आवडत नसे कारण त्यांना नैंसर्गिक सौदर्यच जास्‍त आवडत होती. 

आज शरीराने श्रीदेवी जरी गेल्या असल्या तरी त्यांच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे त्यांना कुणी कधीच विसरणार नाहीत.