Sat, Feb 23, 2019 06:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'कुंकू'फेम अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे अपघाताती निधन

'कुंकू'फेम अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे निधन

Published On: Jan 22 2018 10:55AM | Last Updated: Jan 22 2018 10:55AMमुंबई : प्रतिनिधी

झी  मराठी वाहिनीवरील 'कुंकू' या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे रेल्‍वे अपघातात निधन झाले. सोमवारी पहाटे  मुंबईत मालाडजवळ प्रफुल्‍लचा अपघात झाला. प्रफुल्लच्या अकाली मृत्यूमुळे त्‍याच्या कुटुंबासह मनोरंजन विश्वाला चटका बसला आहे.

'कुंकू' मालिकेत प्रफुल्‍लने जानकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती.