Sun, Mar 24, 2019 05:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेते नरेंद्र झा यांचे निधन

अभिनेते नरेंद्र झा यांचे निधन

Published On: Mar 14 2018 5:29PM | Last Updated: Mar 14 2018 5:29PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते नरेंद्र झा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. नरेंद्र झा यांनी ५५ व्या वर्षी  बुधवारी पहाटे ५ वाजता पालघरमधील फार्म हाऊसवर अखेरचा श्वास घेतला. 

झा यांनी शांती मालिकेतून आपल्‍या सिने करिअरला सुरुवात केली. झी टीव्हीवरील 'रावण' मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. रावणाच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांचा चेहरा घराघरात पोहचला. क्योंकि सास भी कभी बहू थी, संविधान, बेगुसराय, चेहरा या मालिकांमधून त्‍यांनी यशस्‍वी काम केले. तसेच 'घायल वन्स अगेन' चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक प्रचंड गाजला होता. हैदर, रईस, हमारी अधुरी कहानी, काबिल, मोहंजोदारो, शोरगुल, फोर्स 2, फंटूश यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. सलमान खानच्या आगामी ‘रेस 3’ मध्येही नरेंद्र झा यांची महत्वाची भूमिका होती. 

गेल्‍या काही दिवसांपूर्वी त्‍यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर ते मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आराम करण्यासाठी ते पालघरच्या वाडामध्ये असलेल्या फार्म हाऊसवर गेले होते. त्‍याच ठिकाणी त्‍यांनी अखेरचा श्वास घेतला.