Thu, Jun 20, 2019 02:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवींच्या अंत्‍ययात्रेत हसणे जॅकलीनला पडले महागात  

श्रीदेवींच्या अंत्‍ययात्रेत हसणे जॅकलीनला पडले महागात  

Published On: Mar 01 2018 11:17AM | Last Updated: Mar 01 2018 11:14AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी यांना बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित केलेल्‍या श्रध्दांजली सभेसाठी बॉलिवूड कलाकारांसह हजारो चाहते उपस्‍थित होते. यावेळी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही श्रीदेवी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आली होती. सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये जातानाचा तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्‍यामध्ये ती हसत आहे. जॅकलीनच्या या हसण्यावरून नेटकऱ्यांनी तिचा चांगचाल समाचार घेतला आहे. ‘तुला हसायचे होते तर अशा ठिकाणी कशाला यायचे? असे प्रश्न तिला सोशल मीडियावरून विचारण्यात येत आहेत. 

श्रीदेवी यांचे शनिवारी मध्यरात्री दुबईत निधन झाले. बुधवारी मुंबईतील विले पार्ले स्‍मशानभूमीत त्‍यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले. अंत्‍यसंस्‍काराआधी त्‍यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी  सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते. जॅकलीनही श्रीदेवींना श्रध्दांजली वाहण्यासाठी आली होती. मात्र, श्रीदेवी यांच्या निधनाचे दु:ख व्यक्‍त करण्याऐवजी ती हसत असल्‍याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. जॅकलीनच्या या कृत्‍यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली. 

'प्रिय जॅकलीन तुला जर एखाद्या मृतकाच्या प्रती आदर व्यक्‍त करता येत नसेल तर तू अशा ठिकाणी जायला नको पाहिजे,' एका युजरने म्‍हटले आहे. 'जॅकलीनला लाज वाटायला पाहिजे, किमान तू खोटी भूमिका तर करू शकली असतीस,' अशी मतेही सोशल मीडियावरून व्यक्‍त केली जात आहेत.