Thu, Jun 27, 2019 12:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना झाला निमोनिया

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना झाला निमोनिया

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार यांना निमोनिया झाला आहे. मुंबईतील घरीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दिलीप कुमार यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. 

दिलीप कुमार याच्या अकाऊंटवर ‘साहेबांना निमोनिया झाला आहे, डॉक्टरांनी त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला दिला आहे, देवाचे आभार मानतो की, बाकी सर्व गोष्टी नॉर्मल आहेत, साहेबांची तब्बेत आता ठिक आहे. दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करा’ असे ट्विट करण्यात आले आहे.    

काही दिवसांपूर्वीच दिलीप कुमार किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. ८ दिवस हॉस्पिटलमध्ये राहून त्यातून बरे होऊन ते घरी परतले होते. फैसल फारूकी हे दिलीप कुमार यांचे मित्र असून त्यांचे ट्विटर हँडल ते सांभाळतात.