Sun, May 19, 2019 14:42
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनुष्का इटलीला रवाना, १५ डिसेंबरला होणार लग्‍न?(व्हिडिओ)

अनुष्का इटलीला रवाना, १५ डिसेंबरला होणार लग्‍न?(व्हिडिओ)

Published On: Dec 08 2017 9:33AM | Last Updated: Dec 08 2017 10:09AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर कर्णधार विराट कोहलीला वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी आराम दिल्‍यापासून विराट आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांच्या लग्‍नाच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता अनुष्का शर्मा कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर दिसली आहे. त्यामुळे ती लग्‍नासाठीच मुंबईहून इटलीला जात असल्याची चर्चा जोर धरत आहे.

अनुष्का शर्मा तिच्या आई, बाबा आणि भावासोबत शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसली. सुत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तेथे १५ डिसेंबर रोजी विराटसोबत तिचे लग्न होणार आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, इटलीमध्ये १३ ते १५ डिसेंबर असे तीन दिवस विराट आणि अनुष्काचा लग्नसोहळा रंगणार आहे. १३ डिसेंबरला संगीत, १४ डिसेंबरला हळद आणि १५ डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल.

लग्नासाठी अनुष्का आणि विराट थेट इटलीला जाणार नाही. तर, अनुष्काने शुक्रवारी रात्री मुंबईहून दुबईला उड्डाण केले आहे. दुबईमध्ये लग्नाची खरेदी केल्यानंतर ती तेथून सिंगापूरला जाणार आहे. सिंगापूरमध्ये एक दिवस थांबल्यानंतर दोघे लंडनला जाणार आहे. तेथून ते १२ डिसेंबर रोजी इटलीला पोहोचतील. अशीही माहिती समोर आली आहे. 

दरम्‍यान, विराट आणि अनुष्का शनिवारी लग्‍न करणार असल्याचे वृत्त बुधवारी संध्याकाळी झळकले होते. मात्र, यात काही तथ्य नसून ही केवळ अफवा असल्याचे अनुष्काच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले होते. श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर विराटला वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे. हा धागा पकडून लग्‍नाची अफवा पसरवण्यात आली आहे. विराट आणि अनुष्का २०१३ पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. यापूर्वीही त्यांच्या लग्‍नाच्या अफवा पसरल्या होत्या. इतकेच नव्हे तर या जोडीचा ब्रेकअप झाल्याची चर्चाही २०१५ मध्ये होती. यानंतर या हॉट अ‍ॅण्ड कोल्ड जोडीने अनेक समारंभात एकत्रित सहभागही घेतल्‍याचे पाहायला मिळाले आहे.