Tue, Oct 24, 2017 16:56
29°C
  Breaking News  

होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्‍महत्‍या 

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्‍महत्‍या 

By | Publish Date: Jul 21 2017 2:59PM

मुंबई : पुढारी ऑनलाइन वृत्‍त

अभिनेत्री अंजली श्रीवास्तवने (वय, २९) आत्‍महत्‍या केल्‍याची माहिती समोर आली आहे. अंजलीने मुंबईतील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  अंजली अंधेरीतील जुहू परिसरातल्या परिमल सोसायटीत राहत होती. अंजलीचे नातेवाईक तिला सतत फोन करत होते, मात्र अंजली फोनला प्रतिसाद देत नसल्‍याने त्यांनी घरमालकाशी संपर्क साधला. घरमालकाने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता अंजली साडीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

घरमालकाने तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. मात्र अंजलीने आत्महत्या कधी आणि का केली, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.