Sun, May 26, 2019 11:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : झोपडयावरील कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक

मुंबई : झोपडयावरील कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक 

Published On: Jun 05 2018 3:06PM | Last Updated: Jun 05 2018 3:06PMऐरोली : प्रतिनिधी 

कोपरखैरणे येथील बालाजी मल्टिप्लेक्स समोरील अनाधिकृत झोपडयावंर सिडकोकडून मंगळवारी पोलिस बदोबस्तात कारवाई करण्यात येणार होती. झोपडयावंरील कारवाई करण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यांनतर झोपडपट्टी मधील रहिवाशांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये कोपरखैरणे पोलिस ठाण्याचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले. शिवाजी आवटे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी देखील दगडफेक करणाऱ्या जमावातील १० ते १५ जणांणा ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नवी मुंबई परिमंडळ १ चे पोलिस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. 

कोपरखैरणे येथील बालाजी मल्टिप्लेक्स समोर सिडकोचा असणारा भुखंडावर अनाधिकृत झोपडया बांधण्यात आल्या होत्या. हा भुखंडा सिडकोने सेल केला होता. त्या भुखंडावर तारेचे कंपाऊड टाकत झोपडया हटवण्यात येणार होत्या. त्यासाठी मंगळवारी पोलिस बदोबस्तात कारवाई करण्यात येणार होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिस बदोबस्तात झोपडया हटविण्याची कारवाई करण्यास सुरु करण्यात आली. यावेळी झोपडपट्टीमधील रहिवाशांनी या कारवाईला विरोध करत दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे हे जखमी झाले. 

Tags : pelting stones one policemen, action against Unauthorized slums, Koparkhairane, Balaji Multiplex